NMMS Exam 2022 Maharashtra

 NMMS Exam 2022 Maharashtra 

Exam Date, Application Date, Fees, Exam Medium

                            राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2021-22 (NMMS Exam 2022) ही परीक्षा दिनांक 19 जून 2022 रोजी घेण्यात येणार आहे. सन 2007-08 पासून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता ही परीक्षा घेतली जाते. आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यांना उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेण्यास मदत व्हावी, आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरावर पर्यन्त होणारी गळती रोखली जावी यासाठी ही परीक्षा घेतली जाते.

NMMS exam 2022


NMMS EXAM Date 2021-22

                            महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेमर्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2021-22 (NMMS exam 2022 in Maharashtra) चे आयोजन इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांकरीता रविवार, दिनांक 19 जून 2022 रोजी करण्यात येणार आहे.


NMMS 2022 Exam Timetable

अ.क्र.

दिनांक

विषय

वेळ

१९-०६-२०२२

बौद्धिक क्षमता चाचणी (MAT)

१०.३० ते १२.००

१९-०६-२०२२

शालेय क्षमता चाचणी (SAT)

१३.३० ते १५.००


परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत

                    परीक्षेला बसण्यासाठी आपल्याला या परीक्षेकरिता ऑनलाइन आवेदन पत्र परिषदेच्या https://nmmsmsce.in/ या संकेत स्थळावर भरता येईल. आवेदनपत्र शाळेमार्फत भरावे लागते.

 आवेदन पत्र भरण्याची मुदत व फी

अ.क्र.

 

तपशील

 

दिनांक

शुल्क रुपये

 

ऑनलाईन नियमित आवेदनपत्र भरणे

०६-०४-२०२२ ते २६-०४-२०२२

१०० रु.

ऑनलाईन विलंब आवेदनपत्र भरणे

२७-०४-२०२२ ते ०१-०५-२०२२

२०० रु

ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्र (शाळा/संस्था जबाबदार असेल तर)

०२-०५-२०२२ ते ०६-०५-२०२२

३०० रु

४०० रु


Download NMMS Exam Old Paper for Practice 



आवेदनपत्र भरण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता

  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळेमध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकत असावा
  • परीक्षेला बसू इच्छीत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार पेक्षा कमी असावे.
  • सदर विद्यार्थी -विद्यार्थिनी इयत्ता सातवी मध्ये किमान 55 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.एससी एसटी विद्यार्थी किमान 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.
  • विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालय शिकणारे विद्यार्थी, शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी आणि सैनिकी शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी हे या परीक्षेसाठी बसू शकत नाहीत.

परीक्षेचे माध्यम

ही परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, सिंधी, कन्नड, तेलगू या आठ माध्यमातून देता येईल.

NMMS शिष्यवृत्ती किती मिळते?

शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इयत्ता नववी ते बारावी पर्यंत दरमहा 1000 रुपये म्हणजेच वार्षिक 12 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या