Suttichya divsant swadhay iyatta tisari

सुट्टीच्या दिवसांत

इयत्ता - तिसरी.





प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते?
कवितेतील मुलाला आकाशात सुट्टीच्या दिवसांत
उडावेसे वाटते.

आ) सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते?

सुट्टीच्या दिवशी इंद्रधनूच्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते.

इ) सुट्टीच्या दिवसांत नेहमीचे जग कसे होते?

सुट्टीच्या दिवसांत नेहमीचे जग जादूने अद्भुत होते.

प्र २) खालील शब्दांपुढे कंसातील योग्य शब्द लिहा.

उदा. , घमघमणारा - वास .

( पंख, पाणी, पक्षी, वारा )

अ) खळखळणारे - पाणी.

आ) फडफडणारे - पंख.

इ) किलबिलणारे - पक्षी.

ई) घोंघावणारा - वारा.

प्र ३) खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा.

अ) उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो.

उन्हातही अंगाला बिलगे , माळावरचा उनाड वारा.

आ) समुद्रातून पोहून जावे, उंच उंच पर्वत चढून जावे.

वाटे पोहू सती सागर , गगनचुंबी ओलांडू पर्वत.

इ) सुट्टीच्या दिवसांत वेळ कसा गेला हे लक्षात न येणे.

सुटे भान काळाचे सगळे,

सुट्टी मध्ये कसे काय ते-

आठवड्या- महिन्या- वर्षांचे,

कालचक्र मोडूनच पडते !






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या