Shabd dongar | शब्द डोंगर

मराठी शब्द डोंगर

Shabddongar


शब्दडोंगर फायदे:

  • मुलांना वाचनाची आवड निर्माण होते.
  • वाक्य वाचता येते.
  • वाक्य रचना समजते.
  • वाक्यातील योग्य शब्दाचा वापर समजतो.
  • विशेषणचा वापर करता येतो.
  • कल्पना शक्तीला चालना मिळते.

शब्द डोंगर घर

घर
माझे घर
हे माझे घर
हे माझे घर आहे.
हे माझे घर सुंदर आहे.
हे माझे घर खूप सुंदर आहे.
हे माझे घर व परिसर खूप सुंदर आहे.

शब्द डोंगर आंबा


आंबा
हा आंबा
हा आंबा आहे.
हा पिकलेला आंबा आहे.
हा पिकलेला आंबा गोड आहे.
हा पिकलेला आंबा खूप गोड आहे.
हा पिकलेला आंबा खूप गोड, रसाळ आहे.
हा पिकलेला आंबा खूप गोड, रसाळ व पिवळा आहे.

शब्द डोंगर झाड

झाड
झाड आहे.
ते झाड आहे.
ते आंब्याचे झाड आहे.
ते आंब्याचे हिरवेगार झाड आहे.
ते हापूस आंब्याचे हिरवेगार झाड आहे.
ते हापूस आंब्याचे हिरवेगार व डेरेदार झाड आहे.



शब्द डोंगर फुल

फुल
आवडते फुल
माझे आवडते फुल
माझे आवडते फुल मोगरा
माझे आवडते फुल मोगरा आहे.
माझे आवडते फुल पांढरा मोगरा आहे.
माझे आवडते फुल शुभ्र पांढरा मोगरा आहे.

शब्द डोंगर शाळा

शाळा
शाळा आवडते.
ही शाळा आवडते.
ही माझी शाळा आवडते.
ही माझी शाळा मला आवडते.
ही माझी शाळा मला खूप आवडते.
ही माझी सुंदर शाळा मला खूप आवडते.

शब्द डोंगर गाव

गाव
माझे गाव
हे माझे गाव.
हे माझे गाव आहे.
हे माझे गाव निसर्गरम्य आहे.
हे माझे गाव हिरवेगार, निसर्गरम्य आहे.
हे माझे गाव हिरवेगार, सुंदर व निसर्गरम्य आहे.
हे माझे आवडते गाव हिरवेगार, सुंदर व निसर्गरम्य आहे.

शब्द डोंगर नदी

नदी
ही नदी
ही नदी आहे.
ही पंचगंगा नदी आहे.
ही पंचगंगा नदी वाहत आहे.
ही पंचगंगा नदी भरून वाहत आहे.
ही पंचगंगा नदी पात्र भरून वाहत आहे.
ही पंचगंगा नदी पात्र भरून पूर्वेकडे वाहत आहे.

शब्द डोंगर सूर्य

सूर्य
तो सूर्य
तो सूर्य आहे.
तो सूर्य तेजस्वी आहे.
तो सूर्य खूप तेजस्वी आहे.
तो सूर्य खूप उष्ण, तेजस्वी आहे.
तो सूर्य खूप उष्ण, तेजस्वी व तप्त आहे.
तो आकाशातील सूर्य खूप उष्ण, तेजस्वी व तप्त आहे.

शब्द डोंगर खेळ

खेळ
खेळ खेळतो.
आम्ही खेळ खेळतो.
आम्ही मित्र खेळ खेळतो.
आम्ही मित्र खो-खो खेळ खेळतो.
आम्ही सर्व मित्र खो-खो खेळ खेळतो.
आम्ही सर्व मित्र मैत्रिणी आवडीने खो-खो खेळ खेळतो.

शब्द डोंगर आई

आई
माझी आई.
माझी आई बनवते.
माझी आई जेवण बनवते.
माझी आई स्वादिष्ट जेवण बनवते.
माझी आई खूप स्वादिष्ट जेवण बनवते.
माझी आई खूप स्वादिष्ट, रुचकर जेवण बनवते.
माझी आई खूप स्वादिष्ट, रुचकर जेवण व नाश्ता बनवते.

शब्द डोंगर वही 

वही
वही आहे.
ही वही आहे.
ही माझी वही आहे.
ही माझी मराठीची वही आहे.
ही माझी मराठीची दुरेघी वही आहे.
ही माझी आवडती मराठीची दुरेघी वही आहे. 
ही माझी खूप आवडती मराठीची दुरेघी वही आहे.

शब्द डोंगर पेन 

पेन
माझा पेन
माझा पेन दे.
माझा निळा पेन दे.
माझा दप्तरातील निळा पेन दे.
माझा तुझ्या दप्तरातील निळा पेन दे.
माझा तुझ्या दप्तरातील निळा पेन लिहायला दे.
माझा तुझ्या दप्तरातील निळा पेन निबंध लिहायला दे.

शब्द डोंगर बाबा 

बाबा
माझे बाबा
माझे बाबा आहेत.
हे माझे बाबा आहेत.
हे माझे बाबा शेतकरी आहेत.
हे माझे बाबा उत्तम शेतकरी आहेत.

शब्द डोंगर पुस्तक

पुस्तक
माझे पुस्तक 
हे माझे पुस्तक 
हे माझे पुस्तक आहे.
हे माझे मराठी पुस्तक आहे.
हे माझे मराठी विषयाचे पुस्तक आहे.
हे माझे दुसरीचे मराठी विषयाचे पुस्तक आहे.
हे माझे आवडते दुसरीचे मराठी विषयाचे पुस्तक आहे.



 
  




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या