Shayistakhanachi fajiti swadhay iyatta chouthi

शायिस्ताखानाची फजिती

इयत्ता - चौथी.



प्र १) रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

१) शाहिस्ताखानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला.

( पुरंदर ,पन्हाळा, शिवनेरी )

२) शाहिस्ताखानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला. 

( शनिवारवाड्यात, लाल महालात, पर्वतीवर )

३) औरंगजेब बादशाहाने शाहिस्ताखानाची रवानगी बंगालमध्ये केली.

 ( आसाममध्ये, कर्नाटकमध्ये, बंगालमध्ये )

प्र २) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१)  शायिस्ताखान कोणती गावे घेत पुण्याला आला? 

शिरवळ, शिवापुर, सासवड आणि चाकण अशी गावे घेत शायिस्ताखान  पुण्याला आला.

२)  शायिस्ताखानाचे सैन्य हैराण का झाले ?

मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शायिस्ताखानाचे सैन्य हैराण झाले.

३) शायिस्ताखानाला कोणती भीती वाटू लागली ?

'आज बोटे तुटली, उद्या आपले शीर शिवाजी कापून नेईल,' अशी भीती शायिस्ताखानाला वाटू लागली.

प्र ३)  कारणे लिहा.

१) औरंगजेब बादशाहा शिवरायांवर चिडला.

 आदिलशाहीची तह झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे मुघल बादशाहा औरंगजेब शिवरायांवर चिडला.

२) शायिस्ताखान खिडकीवाटे पळू लागला. 

युक्ती करून लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी तलवार उपसलेली पाहून,शायिस्ताखान घाबरला व ओरडत खिडकीवाटे पळू लागला.

प्र ४) घटना कलानुक्रमे लावा.

१) शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली.

२) शायिस्ताखानाने लाल महालात मुक्काम ठोकला.

३) शायिस्ताखानाने चाकणचा किल्ला घेतला.

४) शिवरायांनी शायिस्ताखानाची खोड मोडली.

घटना कालानुक्रमे.

१) शायिस्ताखानाने चाकणचा किल्ला घेतला.

२) शायिस्ताखानाने लाल महालात मुक्काम ठोकला.

३) शिवरायांनी शायिस्ताखानाची खोड मोडली.

४) शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या