एकदा गंमत झाली स्वाध्याय
इयत्ता - तिसरी
प्र १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता?
आम्ही आनंद झाल्यावर टाळ्या वाजवतो.
आ) नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते?
डोंगरावरून छोटेछोटे प्रवाह नदीला येऊन मिळतात तेव्हा नदीचे पाणी आणखी वाढते.
प्र २. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
अ) झाडं मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात.
आ) एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो.
प्र ३. कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
( पुढेपुढे, छोटेछोटे, तरंगत तरंगत , गारगार, उंचउंच )
अ) गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली.
आ) झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पान
इ) पिंपळाची दोन पानं तरंगत तरंगत खिडकी तून आत आली.
ई ) नदी पुढे पुढे जाऊ लागते.
उ) बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोळ.
मुग्धा लिहू लागली स्वाध्याय
प्र ४. या पाठात एकच शब्द दोन वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत , उदा. उंचउंच .असे आणखी शब्द सांगा.
गारगार, छोटेछोटे, पुढेपुढे , तरंगत तरंगत
प्र ५. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
अ) सरळ × वाकडी
आ) पुढे × मागे
इ) शांत × अशांत
ई) लांब × आखूड
उ) लहान × मोठे
ऊ) हसली × रडली
प्र ६. पाठात ' टोकदार ' शब्द आलेला आहे. त्यासारखे शब्द बनवा.
अ) रुबाब - रुबाबदार
आ) समजूत - समजूतदार
इ) धार - धारदार
ई) पाणी - पाणीदार
उ) तजेल - तजेलदार
ऊ) चमक - चमकदार
प्र ७. खालील अर्थ समजावून घ्या व लिहा.
अ) अलगत उचलणे - हळुवार उचलणे .
आ) एकटक पाहणे - एकसारखे पाहणे .
इ) मोरपीस फिरवल्यासाखे वाटणे - खूप आनंद होणे.
ई) सुखावणे - आनंद होणे.
उ) दंग होणे - मग्न होणे .
0 टिप्पण्या