वय जस जसे वाढते
इयत्ता - तिसरी. परिसर अभ्यास.
अनोळखी व्यक्तीचे केस काळे आहेत की पांढरे आहेत. केस दाट आहेत की टक्कल पडले आहे. दात पडले आहेत की नाही. तसेच ती व्यक्ती आई बाबांचे नाव आदराने घेतली की एकेरी. यावरून आम्ही त्या व्यक्तीच्या वयाचा अंदाज घेऊ.
प्र २) जरा डोके चालवा.
१) मांजर आपली पिल्ले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी हलवते ?
मांजर पिल्लांच्या मानेजवळ तोंडाने अलगद पकडते. पिल्लांना हळुवारपणे उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवते.
२) म्हातारपणी काही आजोबांचे केस पांढरे होतात. काही आजोबांच्या केसांमध्ये म्हातारपणाची आणखी एक खूण दिसते. ती कोणती ?
काही आजोबांचे केस विरळ होतात किंवा टक्कल पडते.
३) म्हातारपणामुळे त्वचेवर कोणता परिणाम होतो ?
म्हातारपणामुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात.
४) उसळी करण्यासाठी मूग, मटकी, चवळी इत्यादी. कडधान्य भिजत घालून त्यांना मोड आणतात. त्यासाठी तुम्ही कोणता शब्द वापराल ?
बिजांकुरण.
प्र ३) गाळलेले शब्द भरा.
१) घरात बाळ जन्माला येते त्याचा घरादाराला आनंद होतो.
२) नियमित व्यायाम केला तर त्याचा फायदा होतो.
३) फुलांपासून फळे तयार होतात.
प्र ४) थोडक्यात उत्तरे द्या.
१) मुला मुलींची उंची वयाच्या कितव्या वर्षापर्यंत वाढते?
मुला मुलींची उंची वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत वाढते.
२) प्रकृती उत्तम राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत होते ?
प्रकृती उत्तम राहण्यासाठी चांगला आहार चांगल्या सवयी व नियमित व्यायाम या गोष्टींची मदत होते.
३) वनस्पतीला फुले कधी येऊ लागतात ?
वनस्पतीची योग्य वाढ झाली की वनस्पतीला फुले येऊ लागतात.
प्र ५) चूक की बरोबर ते सांगा.
१) वाढ होताना बाळाच्या वजनात आणि उंचीत वाढ होते.
बरोबर
२) वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत प्रकृती उत्तम राहते.
चूक
३) अंकुर मातीत रुजला नाही तरी रोप जोम धरते.
चूक
४) मातीतले पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात.
बरोबर
0 टिप्पण्या