How to check 5th and 8thScholarship exam result 2022

 शिष्यवृत्ती परीक्षा 2022 चा निकाल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत जुलै महिन्यामध्ये इयत्ता व पाचवी आठवी करिता शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा अंतरिम निकाल सात नोव्हेंबर 2022 रोजी परीक्षा परिषद मार्फत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Scholarship exam result 2022


अंतरिम निकाल म्हणजे काय?

सध्या परीक्षा परिषदेमार्फत अंतरिम निकाल प्रसिद्ध केला आहे. म्हणजेच या निकालाबाबत आपल्या काही शंका अथवा अक्षेप असल्यास आपण त्याबाबत परीक्षा परिषदेशी ऑनलाईन संपर्क करून त्या मांडू शकतो. तसेच आपणास वाटत असल्यास आपण आपल्या परीक्षेतील पेपरची फेर तपासणी करून घेऊ शकतो. विहित मुदतीत सर्व तपासणी झाल्यानंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. आपणाकडून कोणत्याही अक्षेप नसल्यास हाच निकाल अंतिम निकाल म्हणून जाहीर करण्यात येतो.

शिष्यवृत्ती निकाल कसा पहावा?

इयत्ता पाचवी आणि आठवी चा निकाल पाहण्याची पद्धती सारखीच आहे.
  • सर्वात प्रथम परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. www.mscepune.in
  • त्यानंतर संकेतस्थळावरील डाव्या बाजूला असलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा या टॅबला क्लिक करा.
  • त्यानंतर ओपन होणाऱ्या पेज मधील शिष्यवृत्ती परीक्षा 2022 निवडा.
  • त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल विद्यार्थ्यांकरीता या टॅब वर क्लिक करा.
  • त्यानंतर जे पेज ओपन होईल त्या पेजवर आपला परीक्षेतील सीट नंबर टाकून submit करा.
  • सबमिट केल्यानंतर आपल्याला आपला निकाल दिसून येईल.
 निकाल कसा पाहावा येथे अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.









Thanks

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या