Face value and Place value | दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत

 दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत 

Face value and Place value

face value


                संख्या लेखनासाठी आपण 0,1,2,3,4,5,6,7,8,9 या अंकांचा वापर करतो. कोणत्याही संख्येचे लेखन करण्यासाठी या दहा अंकांचाच वापर केला जातो. या अंकांचा उपयोग करून तयार होणाऱ्या संख्येची मूल्य ठरविण्यासाठी आपण या अंकाच्या स्थानिक किमतीचा उपयोग करतो. अंकाच्या स्थानावरून त्या संख्याची किंमत ठरवले जाते.

       1 ते 9 या अंकांची किंमत दोन प्रकारची असते.

  1.  दर्शनी किंमत 
  2.  स्थानिक किंमत

1. दर्शनी किंमत 

                    संख्येतील एखाद्या अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाच्या मूल्या इतकीच असते. दर्शनी किमती अंकाच्या स्थानावर अवलंबून असत नाही.अंक कोणत्याही स्थानी असला तरी त्या अंकाची दर्शनी किंमत त्या अंकाच्या मूल्या इतकीच राहते.

                उदा- 4565 या संख्यामध्ये 5 हा अंक एकक स्थानी व शतक स्थानी आहे; असे असले तरी 5 या अंकाची दर्शनी किंमत की दोन्ही ठिकाणी पाचच आहे. म्हणजेच जरी अंकाचे स्थान बदलले तरी त्या अंकाची दर्शनी किंमत मात्र सारखीच राहते. दर्शनी किंमत त्या अंकाची सर्वत्र सारखीच असते. दर्शनी किंमत बदलत नाही.
4689, 3004 या दोन्ही संख्येतील चार या अंकाची दर्शनी किंमत सारखीच म्हणजे चार आहे.

2. स्थानिक किंमत

                        संख्येतील अंकांच्या स्थानावरून जी किंमत ठरते तिला स्थानिक किंमत म्हणतात. म्हणजेच अंकांची स्थानिक किंमत ही तो अंक संख्येमध्ये ज्या स्थानावर आहे त्यानुसार ठरते. त्याचे स्थान बदलले तर त्याची किंमत बदलते. प्रत्येक स्थानानुसार ती किंमत वेगवेगळी असते.

                उदा- 46364 या संख्येत 6 अंक दोन वेळा आला आहे. तो दशक व हजार स्थानी आहे. संख्येतील हजार स्थानी असलेल्या 6 ची स्थानिक किंमत 6000 आहे व दशक स्थानी असलेल्या 6 ची स्थानिक किंमत 60 आहे म्हणजेच स्थानिक किंमत ही त्या संख्येच्या स्थानावरून ठरते.

अंकांची स्थानिक किंमत काढताना ती खालील प्रमाणे काढता येईल.
अंकांची स्थानिक किंमत = अंक × स्थानाची किंमत
                                    =     6 × (6 चे स्थान दशक आहे)
                                    =     6 × 10 = 60
  • एकक स्थानी असणाऱ्या अंकांची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सारखीच असते.

  • एकक स्थानावरील अंकांची स्थानिक किंमत ही सम अथवा विषम असू शकते आणि इतर स्थानावरील स्थानिक किंमत ही सम संख्याच असते. 

  • दर्शनी किंमत ही कोणत्याही स्थानी सम अथवा विषम असू शकते.

  • 0 ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सर्वत्र 0 च असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या