Vatadya swadhay iyatta chouthi

वाटाड्या

इयत्ता - चौथी.



प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) मिनू कशाला घाबरत होती?

   मिनू रस्ता ओलांडायला घाबरत होती.

२) मिनूला दररोज शाळेत कोण पोहोचवत असे?

    मिनूला दररोज शाळे तिचे बाबा पोहोचवत असत.

३) मिनूने कोणाचे बोट पकडले?

मिनूने काकांचे बोट पकडले.

४)' मिनूला रस्ता ओलांडायला मदत करणाऱ्या काकांना दिसत नव्हते.' हे पाठातील कोणत्या वाक्यावरून कळते?

समोरून येणाऱ्या माणसाची चाहूल लागली. ते  आर्जवाने म्हणाले, "मला दिसत नाही, पलीकडे पोहोचवता का?"

प्र २) गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.

१) आई किंवा बाबांचं बोट धरलं की भीती गायब.

२) माझं नाव आहे मृणालिनी, पण सगळे मला मिनू म्हणतात.

३) मेनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले.

४) आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार.

प्र ३)  कोण,कोणाला म्हणाले?

१) "मग आज नाही आला तो?"

 काका मिनूला म्हणाले.

२) "रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही."

काका मिनूला म्हणाले.

३)" तिकडे नाही हो. इकडे, या बाजूला."

मिनू काकांना म्हणाली.

प्र ४) पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना मराठीत काय म्हणतात ते लिहा.

१) प्लीज - कृपया

२) क्रॉस - ओलांडणे

३) टीव्ही -  दूरदर्शन संच

४) ग्राउंड - भूभाग , भूपृष्ठ 

प्र ५) स्वतःला दिसत नसूनही काकांनी मिनूला रस्ता ओलांडायला कशी मदत केली ते पाच सहा वाक्यांत लिहा.

मिनूने काकांचे बोट पकडले. काकांनी मेनूला झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते विचारले ,झेब्रा क्रॉसिंग पाशी येताच त्यांनी मिनूला दोन्ही बाजूंना येणारी वाहने नीट पाहायला सांगितले. डाव्या उजव्या बाजूंना बघायला सांगितले. आणि वाहने दूर आहेत की नाही हे विचारून खात्री केली.अशा तऱ्हेने मिनूला काकांनी रस्ता ओलांडायला मदत केली.

प्र ६) खालील प्रश्नांची उत्तरे सांगा.

१) काकांनी मिनूला मदत केली, तशी तुम्ही कोणाकोणाला मदत केली ? कशी मदत केली?

काकांनी मेनूला मदत केली तशी मी एका आजीला ओझे रस्त्याच्या पलीकडे नेऊन देण्यासाठी मदत केली.

२) अंध व्यक्ती मुले मुली स्वतःची कामे स्वतः करतात म्हणजे ते स्वावलंबी असतात तसे तुम्ही स्वावलंबी आहात का?

 असल्यास - तुम्ही स्वतःची कोणकोणती कामे स्वतः करता?

नसल्यास -  स्वावलंबी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल?

मी माझे स्वतःचे काम स्वतः करतो म्हणजे मी स्वावलंबी आहे. मी स्वतःचे अंथरूण घालणे व आवरणे तसेच स्वतः आवरून शाळेत जातो.

प्र ७) तुम्ही कधी भीतीदायक सिनेमा पाहिला आहे का? चौथीतल्या जिग्नेशने असा एक सिनेमा पाहिला. तो सिनेमा पाहताना त्याला काय वाटले ते त्याने लिहिले आहे. कंसातील योग्य शब्द वापरून त्याचे लेखन पूर्ण करा.

( कानाचा, घसा, श्वास, डोळे, कानठळ्या, छाती, जीव, पाय )

सिनेमाच्या सुरुवातीला अगदी शांत रस्त्यावर एक मुलगा चालला होता. सगळं इतकं शांत होतं की आपल्या श्वास घेण्याचाही आवाज यावा आणि एकदम एक कानठळ्या बसणारी किंकाळी ऐकू आली. कानाचा पडदा फाडतो की काय असं वाटलं. सिनेमात एक भली मोठ्ठी घार उडत आली आणि त्या छोट्या मुलाच्या अगदी जवळून गेली. माझी छाती जास्त जोरात धडधडू लागली. आई बाबांच्या मधे बसून मी सिनेमा पाहत होतो, पण तरीही घसा कोरडा पडला. मध्यंतराआधीचे गुहेतल्या पाठलागाचे दृश्य पाहून तर पाय लटालटा कापू लागले. भीतीने डोळे पांढरे पडू लागले, पण सिनेमा पाहायचाच होता. हे सगळं पडद्यावर चालतंय, काल्पनिक आहे हे माहीत होतं. तरीही मध्यंतर होईपर्यंत मी जीव मुठीत घेऊन बसलो होतो.

प्र ८) खालील प्रसंग तुमच्यावर कधी आले होते का? त्यावेळी तुम्हाला काय वाटले? तुम्ही काय केले?

१) रस्त्यावरून चालताना एखादे वाहन पाठीमागून भर्रकन आले, जवळून गेले.

रस्त्यावरून चालताना एखादे वाहन पाठीमागून भर्रकन आले, जवळून गेले. की मला भीती वाटली. मी पटकन रस्त्याच्या कडेला झालो.

२) रस्ता ओलांडताना एखाद्या अनोळखी माणसाने तुमचा हात पकडला. तुम्हाला त्याच्याबरोबर चालायला सांगितले.

रस्ता ओलांडताना एखाद्या अनोळखी माणसाने माझा हात पकडला. तेव्हा पहिल्यांदा थोडी भीती वाटली, नंतर त्याच्या चांगुलपणाची खात्री पटल्यावर मी त्याच्याबरोबर रस्ता ओलांडला.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या