Sundar dat swachh sharir swadhay iyatta tisari

 सुंदर दात,स्वच्छ शरीर

इयत्ता तिसरी.परिसर अभ्यास.



प्र १) काय करावे बरे ?

मित्राचा दात दुखतो आहे. तो डॉक्टरांच्या भीतीपोटी कोणाला सांगत नाही. पण त्याला डॉक्टरांकडे पाठवायचे आहे.

पहिल्यांदा मित्राच्या मनातील डॉक्टरांची भीती दूर करू. डॉक्टर कडे गेले, तर डॉक्टर तुझ्या दुखणाऱ्या दाताची पाहणी करून त्यावर इलाज करतील. त्यामुळे तुझे दुखणे कमी होईल. तू डॉक्टरांकडे गेला नाहीस तर तुझे दुखणे जास्त वाढेल असे आम्ही त्याला सांगू.

प्र २) जरा डोके चालवा.

१) दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती ? का ?

ब्रश व पेस्ट वापरून दात घासणे ही दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत आहे. ब्रश वापरल्याने दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण बाहेर काढता येतात. पेस्टच्या फेसाने दातांची स्वच्छता होण्यास मदत होते.

२)  नखे का वाढू देऊ नयेत ?

वाढलेल्या नखात घाण अडकून राहते. आपण हाताने काही खाताना ही घाण आपल्या पोटात जाते. त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतात. हे टाळण्यासाठी नखे वाढू देऊ नयेत.

३) बाजारातून आणलेली द्राक्षे धुऊन खाण्याची गरज का असते ?

बाजारातून आणलेल्या द्राक्षांवर धूळ आणि घाण बसलेली असते. द्राक्ष मळेवाल्याने त्यावर कीटकनाशके, औषधे, फवारलेली असतात. द्राक्षे न धुताच तसेच खाल्ली तर ही सर्व घाण आपल्या पोटात जाऊन आपले पोट बिघडेल. म्हणून बाजारातून आणलेले द्राक्ष धुऊन खाण्याची गरज असते.

४) सकाळी उठल्यावर दात घासण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्वाचे असते, त्याचे कारण काय ?

दिवसभरात आपण जे जे खाल्लेले असते. त्याचे कण दातात किंवा तोंडात अडकून राहतात. रात्रभर कुजलेले अन्नकण तोंडात राहिले तर दात किडायला सुरुवात होईल. तोंडाला घाणेरडा वास येईल. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्त्वाचे असते.

५) बाहेरून आल्यावर हात पाय धुण्याची पद्धत का आहे  ?

घराबाहेर असताना आपले हात पाय अनेक कारणाने अस्वच्छ होतात. आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवली पाहिजे. नाहीतर आपल्या आरोग्याला धोका पोहोचतो. म्हणून बाहेरून आल्यावर हात पाय धुण्याची पद्धत आहे.

प्र ३) गाळलेले शब्द भरा.

) दुधाचे दात सातव्या, आठव्या वर्षी पडतात.

२) कुजलेले अन्नकण तोंडात राहिले, की त्याचा परिणाम होऊन दात किडतात.

३) ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात.

४) दात घासताना जीभ आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात.

५) पाच ज्ञानेंद्रियांची ही स्वच्छता ठेवायला हवी.

प्र ४) खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

१) हिरड्या खराब का होतात ?

दातांच्या फटीत अन्नकण अडकून ते कुजतात. असे वारंवार होत राहिले की हिरड्या खराब होतात.

२) काहीही खाल्ले की तोंड कसे धुवावे ?

प्रथम चूळ भरावी, तोंडाच्या आतून व बाहेरून बोट फिरवावे. मग खळखळून पाच-सहा वेळा चुळा भराव्यात. शक्य असेल तर दातावरून ब्रश फिरवावा.

३) जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ का धुवावेत ?

आपण अस्वच्छ हाताने जेवण केले तर हातावरील घाण आपल्या पोटात जाईल. त्यामुळे पोट बिघडेल. आपण आजारी पडेन.म्हणून जेवायला सुरुवात करण्याच्या आधी हात स्वच्छ धुवावेत.

४) तोंड धुण्यासाठी ब्रश आणि पेस्ट वापरण्याचे फायदे कोणते ?

ब्रश आणि पेस्ट वापरल्यामुळे दातांमधील फटी स्वच्छ करता येतात. पेस्टच्या फेसामुळे दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण बाहेर येतात.

५) स्वच्छता ठेवली नाही तर काय होते ?

स्वच्छता ठेवली नाही तर आपल्याला निरनिराळे आजार होतात.

६) दात अस्वच्छ असतील तर पोटाचे विकार का होतात?

दात अस्वच्छ असतील तर हिरड्याही खराब होतात. हिरड्यांमधून रक्त आणि पू यायला सुरुवात होते. ही घाण आपल्या पोटात जाते. त्यामुळे पोटाचे विकार होतात.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या