Ranpakhara swadhyay iyatta tisari

 रानपाखरा 

इयत्ता - तिसरी



प्र १. कवितेच्या ओळी शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा.

अ) घरा - खरा

आ)त्यावरी - गोजिरी

इ) सानुला - तुला 

ई)भास्कर - सुस्वर

प्र २. खालील गोष्टींचे वर्णन करणारे  कवितेतील शब्द लिहा.  

उदा., शरीर  - निळसर

अ) डोळे  - सतेज

आ) पाय   - चिमुकले

इ) पंख - चिमुकले

ई) देह -  सानुला

उ) आभाळ  - अफाट 

ऊ) गाणे - सुस्वर 

प्र ३. एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावते?

कवितेतील मुलगी रोज सकाळी रानपाखराला बोलावते.

आ) रानपाखराची डोळे कसे आहेत?

रानपाखराचे डोळे सतेज चमचमणाऱ्या रत्नासारखे आहेत.

इ) रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला कोणता प्रश्न पडला आहे?

रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला प्रश्न पडला की   तुला अफाट आभाळातून कसे उडता येते.

ई) सूर्य डोंगर चढून वर कधी येतो?

रात्र संपताच सूर्य डोंगर चढून वर येतो.

उ) कवितेतल्या मुलीला रानपाखरा बरोबर कोठे जायचे आहे?

कवितेतल्या मुलीला रानपाखरा बरोबर रानपाखराच्या घरी जायचे आहे.

ऊ) कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे?

कवितेतल्या मुलीला भेटायला रानपाखराची आई व सूर्य येणार आहे.

ए) कवितेतल्या मुलीला मजा केव्हा येईल असे वाटते?

रानपाखराची आई व सूर्य भेटायला आल्यावर कवितेतल्या मुलीला मजा येईल असे वाटते.

प्र४. कोणाला म्हटले आहे ते लिहा.

अ) जीवाचा मित्र - रानपाखरा

आ) गोजिरी रत्ने - रानपाखराचे डोळे

 प्र ५. कवितेतल्या मुलीला रानपाखरू गाणे गाऊन उठवते खालील मुले कशी उठत असतील याची कल्पना करून रिकाम्या जागा भरा.

उदा., रेश्माला तिची आई उठवते. ती 'रेश्मा, ऊठ लवकर', अशा हाका मारून उठवते.

अ) सतीशला मोबाईलच्या गजराने जाग येते.

 मोबाईल ..........असा आवाज करून उठवतो.

सतीशला मोबाईलच्या गजराने जाग येते. मोबाईल ट्रिंग ट्रिंग असा आवाज करून उठवतो.

आ) भिकूचे घर दाट जंगलात आहे.त्याला ...... च्या आवजाने जाग येते.

भिकूचे घरदार जंगलात आहे. त्याला पक्षांच्या आवाजामुळे जाग येते.

इ) रफिकच्या घरा मागून रेल्वेची लाईन जाते तो दररोज .......... च्या आवाजामुळे उठतो रेल्वे ......... आवाज करत जाते.

रफीच्या घरा मागून रेल्वेची लाईन जाते. तो दररोज रेल्वेच्या आवाजामुळे उठतो. रेल्वे झुक झुक  आवाज करत जाते.

ई) रेवतीचे घर घाऊक भाजीबाजारासमोर आहे. बाजार पहाटेच सुरू होतो. रेवती दररोज .......... अशा आवाजामुळे उठते.

रेवतीचे घर घाऊक भाजी बाजारासमोर आहे.बाजार पहाटेच सुरू होतो. रेवती दररोज भाजी घ्या भाजी अशा आवाजामुळे उठते.

उ) जानकीचे घर एस.टी. स्टँडच्या अगदी मागे आहे. त्यामुळे ती दररोज....... च्या ..... अशा आवाजामुळे उठते.

जानकी चे घर एसटी स्टँडच्या अगदी मागे आहे. त्यामुळे ती दररोज एस. टी. च्या पमपम अशा आवाजामुळे उठते.

ऊ) जमिलाची आई चादरीच्या कारखान्यात काम करते. त्यांचे घर कारखान्याच्या आवारातच आहे. जमीला रोज ....... च्या आवाजामुळे उठते.

जमिलाची आई चादरीच्या कारखान्यात काम करते. त्यांचे घर कारखान्याच्या आवारातच आहे. जमिला रोज यंत्राच्या आवाजामुळे उठते.

ए) दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेचे रखवालदार आहेत. बागेच्या एका कोपऱ्यात त्यांचे घर आहे दिनेशला रोज....... च्या ....... अशा आवाजामुळे जाग येते.

दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेचे रखवालदार आहेत. बागेच्या एका कोपऱ्यातच त्यांचे घर आहे. दिनेशला रोज पक्ष्यांच्या किलबिल अशा आवाजामुळे जाग येते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या