Padghmvarti tipari padli swadhay iyatta tisari

पडघमवरती टिपरी पडली 

इयत्ता - तिसरी 



 १. थोडक्यात उत्तरे सांगा .

अ) कौलारावर काय पडत आहे?

कौलारावर थेंब टपोरे पडत आहेत.

आ) 'म्हातारी ढगात हरभरे भरडते ' असे का म्हटले असावे?

म्हातारी ढगात हरभरे भरडते असे म्हटले असावे कारण ढग गडगडू लागले होते.

मुग्धा लिहू लागली स्वाध्याय

प्र २. काय झाले?  कसा आवाज आला? 

अ) पडघम वरती टिपरी पडली  -  तडम् तडतड तडम् 

आ) ढग गडगडू लागले - गडगड गडम् 

इ) वीज कोसळली - कडम् कडकड कडम् 

प्र ३. समानार्थी शब्द वाचा व लिहा.

अ) ढग - मेघ , घन

आ) वीज - चपला , विद्युत 

इ) जल - पाणी , उदक 

ई) धरती - धरणी , जमीन 

प्र ४. खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते सांगा.

उदा. हरभरे भरडण्यासाठी - जातं

अ) गहू दळण्यासाठी - गिरणी

आ) बाजरी पाखडण्यासाठी - सूप

इ) मसाला वाटण्यासाठी - मिक्सर, पाटा - वरवंटा 

ई) ज्वारी चाळण्यासाठी - घोळणा 

उ) चहा गाळण्यासाठी - गाळण

ऊ) काकडी कापण्यासाठी - सुरी

एकदा गंमत झाली स्वाध्याय

प्र ५.'पडघमवरती टिपरी पडली ' असे कवितेत म्हटले आहे. खरेतर पडघमवर टिपरी कुणीतरी वाजवली; पण कवीने ' पडघम वर टिपरी वाजवली ' असे न म्हणता 'टिपरी पडली ' असे म्हटले आहे. आता खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ काय होतो ते लिहा.

उदा., कुंडीतल्या रोपावर बुरशी पडली, म्हणजे कुंडीतल्या रोपावर बुरशी वाढली किंवा बुरशी तयार झाली.

अ) सुभानराव निवडणुकीत पडले.

सुभानराव निवडणुकीत पडले म्हणजे सुभानरावांचा निवडणुकीत पराभव झाला.

आ) कैरी पिवळी पडली.

कैरी पिवळी पडली म्हणजे कैरी पिकली.

इ) समीरा आजारी पडली.

समीरा आजारी पडली म्हणजे समीरा आजारी होती.

ई) खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला.

खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला म्हणजे खाऊ मिळाला नाही म्हणून रमेश रुसला.

उ) काल रात्री खूप पाऊस पडला.

काल रात्री खूप पाऊस पडला म्हणजे काल रात्री खूप पाऊस झाला.

प्र६.' तडतड ' यासारखे कवितेत आलेले नादमय शब्द शोधा व लिहा.तुम्हाला माहित असलेले नादमय शब्द सांगा.

१) गडगड 

२) कडकड

३) सळसळ 

४) थरथर


प्र ७. तुम्हाला पावसात भिजायला आवडते का ? भिजल्यावर तुम्हाला काय वाटते ते सांगा व लिहा.

आम्हाला पावसात भिजायला आवडते.भिजल्यावर खूप आनंद होतो.

प्र ८. यासाठी कोणता शब्द वापरतात ते लक्षात घ्या. व योग्य अक्षरे लिहून ते शब्द पूर्ण करा.

१) भित्रा प्राणी - ससा

२) रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द - सडक

३) उन्हाळ्यात पितात - सरबत

४) चौघडा या वादयाबरोबर येणारे दुसरे वादय - सनई

५) उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द - सण 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या