Maze kutumb aani Ghar swadhay iyatta tisari

 माझे कुटुंब आणि घर

इयत्ता - तिसरी.परिसर अभ्यास.प्र १) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) कुटुंबात कोणत्या गरजा पूर्ण होतात ?

कुटुंबात आपल्या अन्न, वस्त्र,आणि निवारा या गरजा पूर्ण होतात.

२) आजारपणात आपली देखभाल कोण करते ?

आजारपणात आपली देखभाल आपले आई-वडील करतात.

३) विस्तारित कुटुंबाचे सदस्य केव्हा एकत्र येतात ? 

सण - उत्सवाच्या काळात विस्तारित कुटुंबाचे सदस्य एकत्र येतात.

४) उत्सवात कोणत्या बाबींची रेलचेल असते ?

उत्सवात गाणी, नृत्य, रांगोळ्या, खेळ,स्पर्धा,शर्यती इ. बाबींची रेलचेल असते.

प्र २) योग्य की अयोग्य लिहा.

१) अडीअडचणीच्या काळात सर्वांनी एकमेकांना मदत करावी.

योग्य

२) घरातील सर्व कामे सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत.

योग्य

३) कचरा कचरापेटीत टाकू नये.

अयोग्य

४) ध्वनीप्रदूषण होईल इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावू नयेत.

योग्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या