Aaplya avatibhovati swadhay iyatta tisari

 आपल्या अवतीभोवती

इयत्ता - तिसरी परिसर अभ्यास.




 प्र १) जरा डोके चालवा.

१) कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत?
कापसापासून कापड तयार करतात, वाती तयार करतात, जखमेवर लावतात, गाड्यामध्ये वापतात.

२) चपला कशापासून बनवतात?
चपला चामड्यापासून, प्लास्टिक आणि राबरापासून बनवतात .

३) चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला, तर चिमणी काय करेल? दगड काय करेल ?
चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला, तर चिमणी उडून जाईल व दगड मात्र तिथेच राहील.

४) पाल काय खाते ?
पाल किडे खाते.

५) तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा.
खुर्ची,टेबल, कपाट,सोफा सेट, बेड इ.

६) कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात?
मांजर, साप हे प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात.

प्र २) गाळलेले शब्द भरा.

१) कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा बदलते.

२) कापूस,लोकर आणि रेशीम यापासून आपण कापड विणतो.

३) झाडांची पाने गळतात.तीही मातीत पडून कुजतात.

प्र ३) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात?

माणसाला परिसरातून  अन्न, वस्त्र निवारा यासाठी लागणाऱ्या निरनिराळ्या वस्तू मिळतात.

२) वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते?

मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात.ते मातीत मिसळतात. झाडांची पाने गळतात. ती ही मातीत पडून  कुजतात त्यामुळे माती कसदार होते. कसदार मातीमुळे वनस्पतीचे पोषण होते. अशा प्रकारे वनस्पतींना परिसरातून मदत मिळते.

३) जंगलातील माती कशामुळे कसदार होते?

जंगलात मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात. ते मातीत मिसळतात. झाडांची पाने गळतात. तीही मातीत पडून असतात. त्यामुळे जंगलातील माती कसदार होते.

प्र ४) चूक की बरोबर ते सांगा.

१) काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. बरोबर

२) वनस्पती निर्जीव आहेत. चूक

३) किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. बरोबर









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या