आपली अन्नाची गरज
इयत्ता - तिसरी परिसर अभ्यास.
अ)जरा डोके चालवा.
१) प्राणी आणि वनस्पती यांच्यातला कोणता फरक या पाठातून तुमच्या लक्षात आला? कोणता फरक या आधी तुम्हाला माहित होता?
वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. प्राणी अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात.
२) खाली दिलेल्या प्राण्यांच्या यादीतून मांस खाणारे आणि न मांस खाणारे प्राणी वेगळे काढा.
( सिंह , हत्ती , गाढव ,लाडंगा ,हरीण, शार्क मासा )
मांस खाणारे - सिंह , लांडगा , शार्क मासा.
मांस न खाणारे - हत्ती , गाढव , हरीण.
३) वाघही मांस खातो, गिधाडेही मांस खातात.पण दोघांच्या मांस खाण्याच्या पद्धतीत फरक आहे, तो कोणता?
वाघ प्राण्यांची शिकार करून मांस खातो. गिधाडे मेलेल्या प्राण्यांचे मांस खातात.
प्र २) खाली दिलेले प्राणी वनस्पतीचा कोणता भाग खाऊन पोट भरतात ते लिहा.
प्राणी वनस्पतीचा कोणता भाग खातात?
शेळी - पाने खातात.
फुलपाखरू - फुलातील रस
सुरवंट - पाने कुरतडून खातात.
डास - वनस्पतीतील रस
प्र ३) थोडक्यात उत्तरे लिहा.
१) पुरेसे अन्न मिळाले नाही, तर त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो?
पुरेसे अन्न मिळाले नाही, तर मरगळ येते, उत्साह वाटत नाही, थकवा जाणवतो.
२) हिंस्र प्राणी माणसाच्या वस्तीत का येतात?
हिंस्र प्राण्यांची कधी कधी उपासमार होते.त्यामुळे त्यांना माणसाच्या वस्तीत येण्याचे धाडस करावे लागते.अशा वेळी ते गोठ्यातील गुरे मारून खातात.
३) माणसाच्या वस्तीत येऊन कोल्हे गाईची शिकार का करत नाहीत?
माणसाच्या वस्तीत येऊन कोल्हे गाईची शिकार करत नाहीत,कारण कोल्ह्याच्या अंगात वाघासारखी ताकद नसते. त्यांना गुरे मारणे अवघड जाते.
प्र ४) पुढे दिलेल्या विषयावर माहिती लिहा.
१) वनस्पती आपले अन्न कसे तयार करतात?
वनस्पतींची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात.या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ विरघळलेले असतात.
हे पाणी वनस्पतींच्या पानापर्यंत पोचते. पानांवर अनेक छोटी छोटी छिद्रे असतात. ती खूप लहान असतात.आपल्या डोळ्यांना ती दिसतही नाहीत. त्यांतून
हवा पानांच्या आत शिरते.अशा प्रकारे पाणी आणि हवा पानांमध्ये एकत्र येतात. सूर्यप्रकाश पानांवर पडला, की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात. वनस्पतींचे अन्न पानांमध्ये तयार होते. त्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते.
२) माणसाला अन्नाची गरज कशासाठी असते?
आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते.अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते.शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते.
३) पाळीव प्राण्यांचे अन्न
गाई, म्हशी पाळणारे लोक त्यांना गवत देतातच,पण आंबोण आणि पेंडसुद्धा देतात.घोड्यांना गवताबरोबर भिजवलेला हरबरा देतात.शेळ्या आणि मेंढ्या गवताबरोबर निरनिराळ्या झुडपांचा पालाही खातात. मांजरांना दूध मनापासून आवडते. पण त्यांना उंदीरही तितकेच आवडतात. मांजरे , चिमण्या, कबुतरे, पारवे अशा पक्ष्यांना मारून खातात.कुत्र्यांना आपण पोळी , भाकरी देतो. पण कुत्र्यांना मांस जास्त आवडते.
मांजरांना आणि कुत्र्यांना पाळणारे लोक त्यांना मांस - मासळी खायला देतात. जंगलात हरीण, नीलगाय, गवे असे प्राणी असतात. ते हिरवा पाला खाऊन राहतात.
0 टिप्पण्या