PUP and PSS Scholarship online form last date
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये 20 फेब्रुवारी 2022 ला होणार आहे. परीक्षा बाबतचे नियोजित वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महाराष्ट्रातील शासनमान्य शाळेत इयत्ता पाचवीत शिकणारा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी बसू शकतो. या परीक्षेला बसण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर www.mscepune.in ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. हा अर्ज विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या लॉगीन वरून भरला जातो यासाठी विद्यार्थ्यांचा फोटो, त्याची सही आवश्यक असते. शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म शाळेमार्फत भरले जातात. हे फॉर्म भरण्याची मुदत खालील प्रमाणे आहे.
ऑनलाइन फॉर्म सादर करण्याची मुदत
Application Start Date- 1 डिसेंबर 2021
Application last Date- 31 डिसेंबर 2021
या कालावधीमध्ये विनाविलंब शुल्क अर्ज करता येतील.
परीक्षा फी
- सर्वसाधारण विद्यार्थ्यासाठी 200 रुपये परीक्षा फी आहे.
- मागासवर्गीय विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी यांना 125 रुपये आहे.
0 टिप्पण्या