Roman numbers | रोमन संख्या

 

 रोमन संख्या चिन्हे

1 TO 100 ROMAN NUMBERS


                जगभरामध्ये संख्या लेखनासाठी निरनिराळी संख्या चिन्हे वापरली जातात. निरनिराळ्या भाषांमध्ये निरनिराळी संख्याचिन्हे वापरली जातात. जसे मराठी मध्ये मराठी अंक, उर्दू मध्ये उर्दू अंक, कन्नड मध्ये वापरले जाणारे अंक वेगळे आहेत. मात्र जगभरामध्ये सर्वच देशात आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचा वापर केला जातो. सर्व शासकीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वापरतात. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाबरोबर रोमन संख्या चिन्हांचा वापरही जगभरात केला जातो. या रोमन संख्या चिन्हांविषयी माहिती पाहूया.
             रोमन संख्या चिन्ह समजून घेण्यासाठी रोमन संख्या विषयी महत्त्वाची माहिती पाहूया. या माहितीच्या आधारे आपण 1 ते 1000 पर्यंत च्या संख्या सहज लक्षात ठेवू शकतो.
  • मराठी मध्ये कोणत्याही संख्या लिहिण्यासाठी ज्याप्रमाणे १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, ० या संख्या चिन्हांचा वापर केला जातो त्याप्रमाणे रोमन संख्या लिहिण्यासाठी I, V, X, L, C, D, M या चिन्हांचा वापर केला जातो.
  • I, V, X, L, C, D, M या संख्या चिन्हांचा वापर करून आपण एक ते हजार पर्यांच्या कोणत्याही संख्येचा लेखन करू शकतो.
  • मराठी संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हासाठी पुढील रोमन संख्या चिन्हाचा वापर केला जातो.
1    -     I
5    -     V
10     -     X
50     -     L
100     -     C
500     -     D
1000    -     M
या संख्या लक्षात ठेवल्यास आपण हजार पर्यंतची कोणतीही संख्या लिहू अथवा वाचू शकतो.
  • रोमन संख्या लेखन करताना I, X, C या संख्या चिन्हांचा वापर सलग जास्तीत जास्त तीन वेळा करता येतो. म्हणजेच 2 हा अंक लिहण्यासाठी II व 3 साठी III लिहितात,  4 साठी IIII न लिहता IV असे लिहितात. तसेच 10 साठी X व 20 साठी XX लिहितात.
  • V, L, D या रोमन संख्या चिन्हांचा वापर फक्त एकदाच होतो यांचा वापर सलग दोन अथवा तीन वेळा करता येत नाही म्हणजे 20 लिहण्यासाठी XVV असे लिहता येत नाही, तर XX असे लिहतात.
  • I, V, X, L, C, D  यापैकी कोणत्याही संख्येच्या उजवीकडे योग्य रोमन संख्या ठेवल्यास त्या मध्ये ही संख्या मिळवली जाते उदा- 22 ही संख्या XXII अशी लिहतात. यामध्ये X+X+I+I =10+10+1+1 =22
  • बेरीज करताना रोमन संख्याच्या लेखनाचा क्रम मोठ्याकडून लहानाकडे असतो. म्हणजे 38 लिहिताना XXXVIII अशी लिहिली जाते. म्हणजेच 10 मोठी संख्या 5 तिच्यापेक्षा लहान व 1 तिच्यापेक्षा लहान.
  • I, V, X, L, C, D  यापैकी कोणत्याही संख्येच्या डावीकडे योग्य रोमन संख्या ठेवल्यास या संख्येमधून ती वजा केली जाते व एक संख्या तयार होते उदाहरणार्थ 42 ही संख्या XLII अशी लिहतात, या मध्ये L च्या डावीकडे X व उजवीकडे II आहे म्हणून 50-10+1+1 =42 ही संख्या तयार होईल.
  • मोठ्या संख्याच्या डावीकडे लहान संख्या लिहिल्यास ती वजा केली जाते.
  • V, L, D हे रोमन संख्याचिन्हे I, X, C या संख्यांच्या पुढे येऊ शकतात मात्र मागे लिहू शकत नाही म्हणजेच 15 ही संख्या XV अशी लिहिली जाते VXX  अशी नाही.



100  पुढील संख्यास लेखन

              • 250= CCL
              • 380= CCCLXXX
              • 500= D
              • 610= DCX
              • 925= CLXXV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या