Swachateche prasarak sant gadagebaba swadhyay


स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा

इयत्ता तिसरी स्वाध्याय


प्र १) एका वाक्यात उत्तरे लिही.

(अ) गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला?

गाडगेमहाराजांचा जन्म वऱ्हाडात शेंडगाव येथे झाला.

(आ) डेबूला कशाची हौस होती?

कोणतेही काम मानापासून करण्याची डेबूला हौस होती.

(इ) डेबूचा जीव का तुटत होता?

→ काबाडकष्ट करणाऱ्या लोकांचे दु:ख, दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता.

ई) गाडगेबाबांची देवपूजा कोणती?

→ रंजल्या-गांजलेल्यांची सेवा हीच गाडगे बाबांची देवपूजा होती.

२) दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिही?

अ) लोकांचे कोणते वागणे डेबूला आवडत नव्हते?

व्यसनामुळे कर्जबाजारी होणे, कर्ज काढून सण साजरे करणे, रोगराई झाली, तर औषध न देता देवाला नवस करणे, कोंबडे - बकरे यांचे बळी देणे लोकांचे हे वागणे डेबूला आवडत नसे.

आ) गाडगेबाबांनी मनाशी काय ठरवले?

चार चांगल्या गोष्टी लोकांना सांगितल्या तर कुणी आपले ऐकत नाही, आपल्या शब्दाला वजन नाही. आई आपल्यासाठी राबते, कष्ट करते म्हणून आपण तिचे ऐकतो. याचा विचार करून, आपण लोकांसाठी अतोनात कष्ट करायचे म्हणजे लोक न बोलताही आपले ऐकतील व त्यांच्यात सुधारणा होईल, असे गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले.

इ) गाडगेबाबा कीर्तनातून काय सांगायचे?

गाडगेबाबा कीर्तनातून लोकांना उपदेश करायचे की,आपणच आपले भले केले पाहिजे. देव आपल्यातच आहे, त्या देवाला जागृत करा.

ई) गावात वस्तीत जाऊन गाडगेबाबा काय करायचे?

 ज्या गावी किंवा ज्या वस्तीत गाडगेबाबा जायचे, तेथे खराटे, फावडी, घमेले गोळा करायचे. मग सर्व गाव झाडून काढायचे. शेणाने स्वच्छ सारवून काढायचे.

प्र३) खालील वाक्यांत कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पूर्ण करा. (पसार होणे, पायांखाली घालणे, जीव तुटणे, पळ काढणे, पर्वा न करणे)

अ) लोक पाया पडायला येताच गाडगेबाबा गर्दीतून पसार झाले.

आ) सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर पायाखाली घातला.

(इ) आम्ही जवळ जाताच खारीने पळ काढला.

(ई) माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा जीव तुटत होता.

(उ) खेळताना मार लागला तरी मुले पर्वा न करता 

खेळू लागली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या