Thor hutatme swadhay iyatta chouthi

 थोर हुतात्मे

इयत्ता - चौथी.प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) लाहोरच्या तुरुंगातले तीन क्रांतिवीर कोणत्या घोषणा देत होते?

लाहोरच्या तुरुंगातले तीन क्रांतिवीर ' इन्कीलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत होते.

२) १९२८  साली लाहोर मध्ये कशाच्या विरोधात निदर्शने झाली? 

१९२८ साली लाहोर मध्ये 'सायमन कमिशन' च्या विरोधात निदर्शने झाली.

३) भगतसिंगांनी कोणकोणत्या महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले?

भगतसिंगांनी उच्च शिक्षण लाहोर येथे दयानंद अँग्लो - वेदिक महाविद्यालय व नॅशनल कॉलेज मध्ये घेतले.

४) ब्रिटिश सरकारने सुखदेव यांना कशामुळे धमकावले?

किंग जॉर्ज च्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने सुखदेव यांना धमकावले.

५) कोणाकोणाच्या मदतीने सुखदेवांनी ' नौजवान भारत सभा ' स्थापन केली?

कॉम्रेड रामचंद्र, भगतसिंग आणि भगवतीचरण व्होरा यांच्या मदतीने सुखदेवांनी 'नौजवान भारत सभा' स्थापन केली.

प्र २) दोन- तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१) पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून भगतसिंगांनी  काय काय केले?

पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून भगतसिंग कानपूर सोडून दिल्लीला गेले. तेथे 'अर्जुन ' सप्ताहिकात बलवंतसिंग या नावाने काम करू लागले. तेथेही पोलिसांनी लक्ष ठेवल्यामुळे ते लाहोरला आले व मुंडण करून भगतसिंग या नावाने वावरू लागले.

२)' नौजवान  भारत सभा' या संघटनेचे कार्यक्रम कोणकोणते होते?

स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुणांना तयार करणे, तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे, जातीयतेविरुद्ध लढणे व अस्पृश्यतेची पद्धत बंद करणे. नौजवान भारत सभा या संघटनेचे कार्यक्रम होते.

३) बनारसच्या वास्तव्यात राजगुरू यांनी काय काय केले?

संस्कृत शिक्षणासाठी राजगुरू बनारसला गेले. तेथे त्यांनी न्याय शास्त्रातील पदवी मिळवली व इंग्रजी, कन्नड, मल्याळम, हिंदी व उर्दू या भाषा अवगत केल्या. तसेच काही काळ त्यांनी काँग्रेस सेवादलात कार्य केले. बनारसच्या वास्तव्यात ते चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ संन्याल वगैरे नेत्यांच्या ' हिंदुस्थान  रिपब्लिकन आर्मी ' मध्ये दाखल होऊन राजगुरूंनी ' रघुनाथ ' या टोपण नावाने उत्तर भारतात उसळलेल्या क्रांतिकार्यात  सक्रिय सहभाग घेतला. 

प्र ३) जोड्या जुळवा.

१) राजगुरू - खेड

२) भगतसिंग - बंग

३) सुखदेव - चौराबाजार

४) प्रताप वृत्तपत्र - कानपूर

प्र ४) खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.

१) बाळकडू मिळणे.

भगतसिंगांना देशभक्तीचे बाळकडू कुटुंबातून मिळाले होते.

२) सुगावा लागणे.

पोलिसांना चोराचा सुगावा लागला.

३) पाळत ठेवणे.

सैनिकांनी हल्लेखोरांवर पाळत ठेवली.

४) दीक्षा मिळणे.

राजगुरूंना आखाड्याच्या वातावरणात देशभक्तीची दीक्षा मिळाली.

५) निर्धार करणे.

क्रांतिवीरांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांचा बदला घेण्याचा निर्धार केला.

६) भूमिगत होणे.

इंग्रज अधिकाऱ्याच्या हत्येच्या घटनेनंतर चंद्रशेखर आझाद व राजगुरू दोन वर्षापर्यंत भूमिगत होते.

प्र ५) खालील शब्दांना कारक प्रत्यय लावून शब्द बनवा. त्यांचा अर्थ शोधा. असे आणखी शब्द शोधा व लिहा.

१) अन्यायकारक

२) बंधनकारक

३) सुखकारक 

४) अपायकारक


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या