Swarajyasthapanechi pratidya swadhay iyatta chouthi

स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा

इयत्ता - चौथी.प्र १) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१) पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते.

२) मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती.

३) शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती.

प्र २) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने  काय बोलले ?

 " हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया." असे शिव असे शिवराय शेवटी निश्चयाने बोलले.

२) जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला ?

आपण मनी जे धरले ते शिवबा पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास जिजाबाईंना वाटू लागला.

३) शिवरायांनी कोणत्या गोष्टींची खडानखडा माहिती मिळवली ?

शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या सवंगड्यांसह बारीक नजरेने न्याहाळले. चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारुगोळा, हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खडान खडा माहिती मिळवली.

४) शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले?

शिवरायांनी मावळांतील मराठ्यांच्या आपआपसात होणाऱ्या भांडणांना आळा घालायचे ठरवले.

प्र ३) दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१) शिवरायांचे ध्येय कोणते होते ?

यापुढे परक्यांची गुलामी करायची नाही. सर्वांसाठी स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी सर्वांनी झटायचे, खपायचे आणि त्यासाठी सर्वांनी प्राणही अर्पण करायचे असे शिवरायांचे ध्येय होते.

२) शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला ?

शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले.मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगरातील आडमार्ग शोधावे, खिंडी, घाट चोरवाटा निरखाव्या, असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. Puddling involves the heating of cast iron in reverberation furnaces until the steel turns socket organizer into liquefied. One of the largest problems with puddling was that almost about} half of the iron was drawn off the slag because of|as a outcome of} sand was used for the bed. The puddling course of was so inefficient that it wasn’t until the mid-1800s that the technique was refined sufficient to provide even mild metal. Despite the restrictions of puddling, the technique was still used in the creation of the wrought iron used in the building of both the Eiffel Tower and the Statue of Liberty. Check out a few of our ornamental steel panels with patterned openings, if might be} nothing for you you can to|you presumably can} contact us for a customized design. 440Chas a high diploma of energy, hardness, and wear resistance properties.

    उत्तर द्याहटवा