Swarajyache toran bandhale swadhay iyatta chouthi

 स्वराज्याचे तोरण बांधले

इयत्ता - चौथी.



प्र १) रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

१) शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या  परगण्यांची जहागीर होती.

( इंदापूर, सासवड, वेल्हे )

२) शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे, असे ठरवले.

 ( सिंहगड, शिवनेरी, तोरणा )

३) स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली.

( राजगड, रायगड, प्रतापगड )

प्र २) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकमत गाजवत होत्या ?

दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकमत गाजवत होत्या.

२) शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या ?

शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.

३) शिवरायांनी आदिलशाहाला कोणते उत्तर पाठवले?

' जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला. यात दुसरा काहीही हेतू नाही.' असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी आदिलशाहाला पाठवले.

प्र ३) कारणे लिहा.

१) स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली.

तोरणा किल्ला हा एक बळकट आणि प्रचंड असा डोंगरी किल्ला होता. आदिलशाहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी आणि दारूगोळा नव्हता. म्हणून स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली.

२) तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या.

तोरणा किल्ल्यावर दुरुस्तीचे काम चालू असताना मोहरांनी भरलेल्या चार घागरी कामगारांना सापडल्या.  ' ' शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच हे धन दिले,' अशी कामगारांची भावना झाली. स्वराज्याचे ते धन होते. या भावनेने कामगारांनी तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी शिवरायांजवळ मोठ्या आनंदाने आणून दिल्या.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या