शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र
इयत्ता - चौथी.परिसर अभ्यास भाग - २
१) शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्य युगाचा होता.
( प्राचीन, मध्य, आधुनिक )
२) शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले.
( महाराष्ट्रात,मध्य प्रदेशात, उत्तर प्रदेशात )
प्र २) योग्य जोड्या लावा.
१) विजयनगरचा सम्राट - कृष्णदेवराय
२) अहमदनगरचा सुलतान - निजामशाहा
३) विजापूरचा सुलतान - आदिलशाहा
प्र ३) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा.
मुगल सम्राट अकबर ,दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय, तसेच छत्रपती शिवाजी महाराज.
२) शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले?
रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य शिवाजी महाराजांनी हाती घेतले.
३) शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली?
रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली.
प्र ४) वेगळा शब्द ओळखा.
१) स्वराज्य, गुलामगिरी, स्वातंत्र्य - गुलामगिरी
२) रयत, प्रजा, राजा - राजा
0 टिप्पण्या