Samuhjivanasathi sarvjanik vyavastha swadhay iyatta tisari

समूहजीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था 

इयत्ता - तिसरी. परिसर अभ्यास.



प्र १) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) सार्वजनिक सुविधा म्हणजे काय ?

समाजातील सर्वांसाठी असणाऱ्या सोयींना सार्वजनिक सुविधा असे म्हणतात.

२) सार्वजनिक जीवनात आपण कोणत्या सुविधांचा वापर करतो ?

 सार्वजनिक जीवनात आपण वाहतूक, शाळा, दवाखाने, यांसारख्या अनेक सुविधांचा वापर करतो.

३) स्थानिक शासन कोणत्या सेवा पुरवते ?

स्थानिक शासन आपल्याला पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता इ. सेवा पुरवते.

प्र २) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

१) गरजू लोकांना बँक कर्जही देते.

२) नातेवाइकांशी व मित्र-मैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी टपाल सेवेचा उपयोग होतो.

३) लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात.

प्र ३) दिलेल्या अक्षरांच्या आधारे शब्द पूर्ण करा.

१) खेड्यांचा कारभार बघते.

ग्रामपंचायत

२) नगराचा कारभार पाहते.

नगरपालिका

३) मोठ्या शहरांसाठी असते.

महानगरपालिका

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या