Purndarcha vedha v tah swadhay iyatta chouthi

 पुरंदरचा वेढा व तह

इयत्ता - चौथी.प्र १) रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

१) त्या वेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे सुरत.

( पुणे , सुरत , दिल्ली )

२) पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता.

( बाजीप्रभू, तानाजी, मुरारबाजी )

प्र २) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला ?

औरंगजेब बादशाहाच्या फौजा महाराष्ट्र धुमाकूळ घालत होत्या. तेव्हा बादशाहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला.

२) दिलेरखानाने पुरंदरला वेढा का दिला ?

 पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही. हे दिलेरखान जाणून होता. त्यामुळे दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला.

३) मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले ?

शक्ती चालेना, युक्ती उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य; म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले.

४) पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मुलूख देण्याचे कबूल केले ?

पुरंदरच्या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होनांचा मुलुख मोघलांस देण्याचे कबूल केले.

प्र ३) दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१) मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेरखान त्याला काय म्हणाला ?

मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेरखान त्याला म्हणाला, "मुरारबाजी तुझ्यासारखा समशेरबहाद्दर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे. बादशाहा तुला सरदार करतील. जहागीर देतील, बक्षीस देतील !"

२) मुरारबाजीने दिलेरखानास कोणते उत्तर दिले ?

मुरारबाजी दिलेरखानास म्हणाला  " अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे ! तुझा कौल घेतो की काय?  आम्हांला काय कमी आहे ? तुझ्या बादशाहाची जहागीर हवी कोणाला ?"

प्र ४) पाठात आलेल्या नावांच्या अक्षरांवरून शब्द पूर्ण करा.

१) रंगजेब

२) पुरंदर

३) मुरारबाजी

४) हागीर

५) दिलेरखानटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या