गडआला,पण सिंह गेला
इयत्ता - चौथी.
१) तानाजी हा कोकणातील उमरठे या गावचा राहणारा होता.
( महाड, चिपळूण, उमरठे, रत्नागिरी )
२) जयसिंगाने नेमलेला उदेभान कोंढाणा या किल्ल्याचा किल्लेदार होता.
( पुरंदर, कोंढाणा, रायगड, प्रतापगड )
३) तानाजीच्या भावाचे नाव सूर्याजी हे होते.
( रायबा, सूर्याजी, मुरारबाजी, फिरंगोजी )
प्र २) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता ?
कोंढाणा किल्ला उदेभान या रजपूत किल्लेदाराच्या ताब्यात होता.
२) कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या ?
कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, " शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे.
३) ' आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे ' असे कोण म्हणाले ?
'आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे ' असे तानाजी म्हणाले.
प्र ३) दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
१) शेलारमामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय काय म्हणाले ?
शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय म्हणाले, " शेलारमामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत."
२) सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला ?
सिंहगडावर सूर्याची मावळ्यांना म्हणाला, " अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे. तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता ? मागे फिरा. कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा, नाही तर शत्रूवर तुटून पडा."
0 टिप्पण्या