Badshahachya hatavar turi dilya swadhay iyatta chouthi

 बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या

इयत्ता - चौथी.



प्र १) रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

१) शिवराय बादशाहाच्या दरबारात गेले, त्या दिवशी औरंगजेब बादशाहाचा पन्नासावा वाढदिवस होता.

( पन्नासावा, चाळीसावा, साठावा )

२) आग्र्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले.

( झाशीत, मथुरेत, दिल्लीत )

प्र २) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला ?

आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला.

२) आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले ?

आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर संभाजी राजे आणि हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे सेवक राहिले होते.

३) आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले?

आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली.

प्र ३) दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१) शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर का पडले ? 

सल्ला मसलतीच्या महालात औरंगजेबासमोर निवडक सरदार आपापल्या मानाप्रमाणे रांगेत उभे होते. बादशाहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. आपण  ज्यांना पळवून लावले, अशा जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता. शिवरायांना वाटले,  'आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा, पण बादशाहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय ?' त्यांचे डोळे रागाने लाल झाले. हा अपमान त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे शिवराय रागारागाने महालाबाहेर पडले.

२) शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली ? 

शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या. हकीम, वैद्य आले. औषधपाणी सुरू झाले. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत, पण पुढे पुढे ते कंटाळले. व पेटारे उघडून पाहीनासे  झाले. रोज रोज काय पाहायचे असे त्यांना वाटले. ही संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजीराजे पेटाऱ्यातून पसार झाले. अशा रीतीने शिवरायांनी युक्तीने आपली सुटका करून घेतली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या