Zuluk mi vhave swadhay iyatta chouthi

 झुळूक मी व्हावे

इयत्ता - चौथी.प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) कवीला काय व्हावेसे वाटते?

कवीला  एखादी मंद झुळूक व्हावेसे वाटते.

२) कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते?

कळीला हळुवारपणे बोट लावावे असे कवीला वाटते.

३) दिशादिशांतून कवी काय उधळून देतो?

कवी दिशादिशांतून फुलांचा सुगंध उधळून देतो.

४) कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे?

कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे.

५) तुम्हाला काय व्हावेसे वाटते?

आम्हाला फुलपाखरू व्हावेसे वाटते.

प्र २) खालील अर्थाला अनुरूप कवितेतील ओळी लिहा.

१) जिकडे मन आकर्षले जाईल, तिकडे अगदी मनमोकळेपणाने जावे.

घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे.

२) जाता जाता सुगंध उधळत जावे.

परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, 

तो दिशा देशांतुनि फिरता उधळूनि द्यावा.

३) झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे.

झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर.

४) हिरव्यागार शेतात किंवा निळ्याशार नदीच्या काठावर जावे.

 शेतांत पाचुच्या , निळ्या नदीवर शांत,

खुलवीत मखमली तरंग जावे गात.


 प्र ३) कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य लिहा.

( पसार झाले, झुकली, कानोसा घेतला, भरारी घेतली )

१) घरात कोणी आहे का याचा मी कानोसा घेतला.

२) मांजरीला पाहून उंदीर पसार झाले.

३) नदीतल्या पाण्यात झाडाची फांदी झुकली.

४) पक्ष्याने आकाशात भरारी घेतली.

प्र ४) रिकाम्या जागी तुमच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करा.

वाटते मला फुलपाखरू एक मी व्हावे. 

घेईल ओढ मन  जिकडे  तिकडे जावे.

कधी फुलावर तर कधी पानाच्या काठी. 

बागेत कधी वा  डोंगराच्या पाठी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या