ईदगाह
इयत्ता - चौथी.
प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) गावात कशाची गडबड चालली होती?
गावात ईदगाहला जाण्याची गडबड चालली होती.
२) मुलांचा आनंद का उतू चालला होता?
ईदगाहला जाण्यासाठी मुलांचा आनंद उतू चालला होता.
३) हमीद कोणत्या आनंदात होता?
अम्मीजान अल्लाच्या घरून त्याच्यासाठी खूप छान छान गोष्टी आणायला गेली आहे. असा त्याचा विश्वास आहे म्हणून आज हमीद खूप आनंदात होता.
४) हमीदच्या घरी कोणकोण होते?
हमीद आणि त्याची अमीनाआजी हे दोघेच हमीदच्या घरी होते.
५) नमाज संपल्यावर लोक काय करतात?
नमाज संपल्यावर लोक परस्परांना मिठी मारून भेटतात.
६) अमीनाने दिलेल्या पैशाचे हमीदने काय घेतले?
अमीनाने दिलेल्या पैशाचा हमीदने चिमटा घेतला.
प्र २) थोडक्यात उत्तरे लिहा.
१) ईदच्या दिवशीची सकाळ कशी आहे?
ईदच्या दिवशीची सकाळ रम्य, सुंदर आहे. झाडे हिरवीगार दिसत आहेत. शेतात समृद्धी डोलत आहे. आकाश लालेलाल झाले आहे. सूर्य तर किती सुरेख दिसतोय! किती शांत, किती सुखद! जणू तो साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहे.
२) ईदच्या दिवशी मुलांचा आनंद कसा आहे?
गावात ईदगाहला जाण्यासाठी गडबड चालली आहे. मुलं तर खूप आनंदात आहेत. कुणी एक दिवसाचा रोजा पाळलाय तोही फक्त दुपारपर्यंत; पण कोणी तर तोही पाळलेला नाही; पण ईदगाहला जाण्याचा त्यांचा आनंद उतू जातोय. रोज ईदच्या नावाचा जप चालला आहे.ती ईद आज उगवली आहे. मुलांना सगळ्यात जास्त घाई झाली.
३) ईदची प्रार्थना कशी चालते, त्याचे वर्णन करा.
तिची प्रार्थना करताना सगळे एकदम वाकत आहेत. गुडघे टेकत आहेत. कितीतरी वेळ ही हालचाल होते. असे करून नमाज पडतात.
४) ईदगाहजवळच्या मेळ्यात हमीदच्या मित्रांनी काय काय मौज केली?
महमूद ,मोहसिन ,नूर आणि सम्मी झोपाळ्यावरील चक्रातील घोड्यांवर, उंटांवर बसली. महमूदने खेळण्यातील शिपाई घेतला. मोहसिनने पाणक्या घेतला. नंतर कुणी रेवड्या घेतल्या तर कोणी गुलाबजामून, कोणी जिलेबी खातंय, तर कोणी करंजी खातंय अशा तऱ्हेने ईदगाहच्या मेळ्यात हमीदच्या मित्रांनी मौज केली.
५) चिमट्याचे काय काय उपयोग होतात?
फुलके तव्यावरून उतरवायला, विस्तवावर फुलके भाजायला चिमट्याचा उपयोग करतात. कोणी विस्तवातले निखारे चिमट्याने काढतात.
६) हमीदने आणलेला चिमटा पाहून अमीना आजीला काय वाटले?
हमीदने आणलेला चिमटा पाहून अमीना आजी दुःखी झाली. न खाता, न पिता चिमटा घेऊन आला. स्वयंपाक करताना आजीचे हात भाजतात. म्हणून हमीदने चमटा आणला होता. हे ऐकताच अमीनाआजीचे मन भरून आले. तिला रडू कोसळले. पदर पसरून ती हमीदला आशीर्वाद देत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गळत होते. आणि हमीद आजीच्या प्रेमळ खुशीत शिरला होता.
प्र ३)गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.
१) जणू तो साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहे.
२) हमीद चे अब्बा मागच्या वर्षी कॉलऱ्याला बळी गेले.
३) हमीदच्या खिशात तीन पैसे आहेत.
४) दुकानदाराने आधी चिमट्याची किंमत सहा पैसे सांगितली.
प्र ४) शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.
१) आनंद उतू जाणे.
मनालीचा वर्गात पहिला नंबर आला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद उतू गेला.
२) धुडकावून लावणे.
सुट्टीत बाहेरगावी जाण्याचा बेत बाबांनी धुडकावून लावला.
३) मन लालचावणे.
दुकानातील मिठाई पाहून छोट्या राजुचे मन लालचावले.
४) मनावर ताबा मिळवणे.
दिवाळीत कमी फराळ खाऊन ताईने मनावर ताबा मिळवला.
0 टिप्पण्या