Dhulperani swadhay iyatta chouthi

धुळपेरणी

इयत्ता - चौथी.प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) कोणाचा जीव झुरणीला लागला?

मातीचा जीव झुरणीला लागला.

२) कोणते दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते ?

जाचक दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते.

३) धरणीला कशाचा ध्यास आहे?

धरणीला हिरव्या पिकांचा ध्यास आहे.

प्र २) थोडक्यात उत्तरे लिहा.

१) कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्यांच्या मनात कोणकोणते विचार येत असतील?

धूळपेरणी करूनही पावसाचे नक्षत्र कोरडे गेले तर शेतात काही पिकणार नाही, खायला अन्न मिळणार नाही. प्यायला पाणी मिळणार नाही. दुष्काळ पडेल गुराढोरांना चारा खायला मिळणार नाही. जीवन जगणे कठीण होईल असे विचार शेतकऱ्याच्या मनात येत असतील.

२) शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याच्या मनात कोणते विचार येतील?

शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर, शेतकरी खूप आनंदित होईल. खायला प्यायला भरपूर मिळेल. गुराढोरांना चारापाणी मिळेल सर्वत्र संपन्नता येईल. कष्टाचे चीज झाले असे त्याला वाटेल. सुखाचे दिवस येतील.

३) पाऊस पडला नाही तर काय होईल, असे तुम्हाला वाटते?

पाऊस पडला नाही तर सर्वत्र कोरडा दुष्काळ पडेल दुष्काळात माणसांना खायला अन्न व प्यायला पाणी मिळणार नाही नदी नाले आटून जातील. पशुपक्ष्यांचे हाल होतील. जगणे कठीण होईल. पाऊस पडला नाही तर माणसाचे जीवन नष्ट होणे.

प्र ३) ओळी पूर्ण करा.

१) असो बरकत 

     धूळ पेरणीला.

२) कासावीस डोळे 

      बनले चातक.

३) मिळता डोळ्यांना 

     मेघुट इशारे

४) टिपूर मोत्यांची

    आस मोरणीला.

प्र ४) खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.

१) हिरव्या पिसांचा 

    ध्यास धरणीला.

धरणी व्याकुळ होऊन पावसाची वाट पाहत आहे. तिला हिरव्या पिसांचा म्हणजेच हिरव्या नव्या पिकांची ओढ लागली आहे.

२) मातीच्या कणाला 

      फुटले धुमारे.

आभाळात आलेले पावसाचे ढग पाहून मातीच्या कणांना आनंद झाला.जणू मातीचे प्रत्येक मातीच्या प्रत्येक कणाला नवीन कोवळी पालवी फुटलेय असे वाटते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या