आपल्या गावाची ओळख
स्वाध्याय
प्र १. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) गावात कोणकोणत्या वास्तु असतात?
गावात मंदिर, लेणी ,मशीद, चर्च, स्मारक, किल्ला वस्तुसंग्रहालय इत्यादी वास्तु असतात.
२) गावाचे नाव कशामुळे प्रसिद्ध होते?
गावाचा उरूस ,जत्रा ,एखादे धार्मिक स्थळ, किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते.
प्र २. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
१) रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो.
२) दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक आठवडे बाजारावर अवलंबून असतात.
३) तुमच्या परिसरात असलेल्या वास्तूंची माहिती मिळवा.
माझ्या परिसरात मंदिरे, बुद्धविहार, विहारी, तलाव, जंगल आहे.
प्र ३. तुमच्या गावाबद्दलची माहिती मिळवा.
माझ्या गावामध्ये शाळा आहे. माझ्या गावात अनेक प्रकारची मंदिरे आहेत. माझ्या गावात एक तलाव आहे. माझ्या गावात डोंगर आणि टेकड्या आहेत. माझ्या गावात अनेक प्रकारची झाडे आहेत. माझ्या गावात शेते, घरे ,विहिरी आहेत. माझ्या गावात ग्रामपंचायत आहे. माझ्या गावात डेअरी आहे. माझ्या गावात पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. माझ्या गावात जंगल आहे.
0 टिप्पण्या