आपली हवेची गरज
इयत्ता -तिसरी. परिसर अभ्यास.
प्र १) काय करावे बरे?
गर्दीच्या ठिकाणी श्वास घुसमटायला लागला आहे.
गर्दीतून बाहेर मोकळ्या हवेत यावे.
प्र २) गाळलेले शब्द भरा.
( गरज , हवा , श्वासोच्छवास)
१) श्वासोच्छ्वास चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होत असते
२) हवा आपल्या अवतीभोवती पसरलेली आहे.
३) माणसाप्रमाणेच इतर सजीवांनाही हवेची गरज असते.
प्र ३) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१) फुगा फुगवाताना फुग्यात तुम्ही काय भरता?
फुगा फुगवताना फुग्यात हवा भरतो.
२) आपल्याला हवेची गरज का असते?
आपल्याला श्वाससोच्छवासासाठी हवेची गरज असते.
आपला आहार स्वाध्याय
३) कुत्रा श्वसन करतो हे तुम्हाला कसे कळले?
कुत्र्याची छाती वर खाली होताना दिसते त्यावरून कुत्रा श्वसन करतो हे आपल्याला कळते.
४) मांजराला हवेची गरज कशासाठी असते?
मांजराला हवेची गरज श्वसनासाठी असते.
प्र ४) चूक की बरोबर ते सांगा.
१) हवा आपल्याला दिसते. - चूक
२) मासे श्वास घेताना पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करतात. बरोबर
0 टिप्पण्या