Aabhalmaya swadhay iyatta chouthi


 आभाळमाया

इयत्ता - चौथी.

प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) पावसाचे ढग होऊन कोठे कोसळावे असे कवीला वाटते?
पावसाचे ढग होऊन डोंगरावर, दरीत व शेतात कोसळावे असे कवीला वाटते.

२) शेतकऱ्याला बरकत केव्हा येते?

जेव्हा शेते पिकतात तेव्हा शेतकऱ्याला बरकत येते.

३) कवीला उजेड कोठे न्यायचा आहे?

कवीला उजेड गरिबांच्या झोपडीत न्यायचा आहे.

४) पक्षाकडे पाहून कवीला काय वाटते?

पक्षाकडे पाहून कवीला वाटते की, त्याला चोच व पंख फुटावेत.

५)  आभाळमाया का मिळावी असे कवी म्हणतो? 

आनंदाने नाचगाण्यासाठी आभाळमाया मिळावी असे कवी म्हणतो.

प्र २) कवीला खालील गोष्टी पाहून काय व्हावेसे वाटते?

१) पाऊस

कवीला पाऊस होऊन डोंगरदरी आणि शेतात कोसळावे वाटते.

२) पणती 

कवीला पणती होऊन गरिबांच्या झोपडीत उजेड न्यावासा वाटतो.

३) पक्षी

कवीला पक्षी होऊन चोच आणि पंख फुटावेत, आणि तोंडात फळे घेऊन जाऊन भुकेल्यांना वाटावे वाटते.

प्र ३) खालील गोष्टींचा वापर कशासाठी होतो ते सांगा.

१) अंगण - बागडण्यासाठी

२) मैदान - खेळण्यासाठी

३) शेत - धान्य पिकवण्यासाठी

४) फुले - सुवास घेण्यासाठी किंवा हार बनवण्यासाठी

५) दिवा - उजेड देण्यासाठी

प्र ४) तुम्ही कोणासाठी काय द्याल?

१) मित्रांसाठी -  खाऊ देईन.

२) शाळेसाठी - गोष्टींची पुस्तके देईन.

३) घरासाठी   -  आनंद देईन.

४) शेतासाठी - चांगले खत देईन.

५) आईसाठी -  प्रेम देईन.

६) बाबांसाठी - आदर देईन.

प्र ५) तुम्ही पक्षी झाला आहात, अशी कल्पना करून पाच सहा ओळी लिहा.

मी पक्षी झालो तर...

मी पक्षी झालो तर मला खूप आनंद होईल. उडत उडत आभाळात मुक्त संचार करीन डोंगरावर जाईन. वेगवेगळ्या झाडांवर बागडेन. उंच झाडावर घरटे बांधीन. झाडावरची मधुर फळे दररोज खाईन. इतर पक्ष्यांशी मैत्री करेन. आभाळातून निसर्ग पाहीन.











 जेव्हा शेते पिकतात तेव्हा येते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या