शब्द साखळी
इयत्ता - दुसरी
शब्द साखळी हा एक शाब्दिक खेळ आहे. याला शब्द गाडी असेसुद्धा म्हणतात. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी व यातून त्याची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी हा खेळ खूप उपयुक्त आहे. लहान मुले आवडीने शब्द साखळी तयार करतात. शब्द साखळी तयार करताना प्रथम कोणताही शब्द घेऊ शकतो. त्यानंतर त्या शब्दातील शेवटचे अक्षराने सुरू होणारा शब्द त्याच्यापुढे लिहावा. त्यानंतर दुसऱ्या शब्दातील शेवटच्या अक्षराने सुरू होणारे शब्द त्याच्या पुढे लिहावा. अशा प्रकारे ही शब्द साखळी आपल्याला पूर्ण करता येईल. ही साखळी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी विचार करून शब्द शोधतात व लेखन करतात. या ठिकाणी अशाच काही शब्द साखळ्या दिलेल्या आहेत.
घर - रवा - वानर - रणगाडा - दास - ससा - साप - पतंग - गवत - तबला - लाल - लसूण
झाड - डबा - बाग - गटार - रस - सरबत - तबकडी
फोटो - टोपली - लीला - लाकूड - डमरू - रुपया - याक - कमळ
मुलगा - गाव - वसंत - तवा - वाघ - घरटे - टेकडी - डिश - शनिवार - रथ - थडगे - गेम - मगर - रण
सम्यक - कमी - मीठ - ठसा - साखर - रथ - थवा - वाढ - ढळक - काळ
गाय - यश - शहामृग - गवत - तर - रंग - गवा - वाघ - घर - रवा - वाप - पणती - तीळ
कप - पंख - खडू - डूल - लपा - पालक - काळी
हिरवा - वाकडा - दास - सरबत - तराजू - जून - नख - खरात - तळे
पेरू - रुद्रा - द्राक्ष - क्षमा - माधुरी - रीत - तरुण
आंबा - बाजार - जहाज - जग - गरुड- डफली - लीला - लाडू- डुक्कर - रण
पोशाख - खसखस - सहल - लपाछपी - पिन - नकाशा- शाळा
पैसे - सेनापती - तिखट - टक्कल - लता - तारीख - खवा - वाद - दप्तर - रस्ता
जिराफ - फणस - सरदार - रहाट - टकमक - कमान - नशीब
चाफा - फाटका - कागद - दर्शक - कविता - ताक - कमळ
नदी - दीपक - कस्तुरी- रीत - तहान- नशा - शाकाहारी- रीळ
कारखाना - नागरिक - कमतरता - ताग - गस्त - स्तर - रण
कान - नवल - लहान - नऊ - ऊस - सर - रबर -रवी - वीर - रताळी
फोटो - टोक - कपाट - टरबूज - रेखा - खारट - टणक - कण
वही - हीन - नरम - महाग - गरम - मन - नकळत - तक्रार - रसाळ
पुस्तक - करामत - तमाशा - शाल - लकीर - रक्षा
0 टिप्पण्या