5th and 8th Scholarship exam 2022

Scholarship exam 2022

इयत्ता पाचवी आणि आठवी 





                         पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (वी) या  शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. शासनमान्य शाळांमधून सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा देता येईल तसेच आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा देता येईल. 

परीक्षेचे वेळापत्रक / scholarship 5th, 8th exam date 2022

                    सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा यावर्षी 20 फेब्रुवारी 2022 रोजी होणार होती मात्र काही कारणास्तव हि परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. नंतर ही परीक्षा 20 जुलै 2022 रोजी होणार होती.मात्र अतिवृष्टीमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा रविवार 31 जुलै 2022 रोजी होणार आहे.


शिष्यवृत्ती सराव APP Download करण्यासाठी येथे क्लिक करा.  





पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी व वी) वेळापत्रक
परीक्षा रविवार दिनांक 31 जुलै २०२२ 

 

                    पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (वी) या दोन्ही परीक्षा रविवार दिनांक 31 जुलै २०२२ रोजी सकाळी ११ ते ३ या कालावधीत होणार आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत

                           शिष्यवृत्ती परीक्षेची आवेदनपत्रे फक्त Online पद्धतीने भारता येणार आहेत. नियमित शुल्कासह दिनांक 1 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरता येतील. 31 डिसेंबर 2021 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही.


शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता 

  1. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. विद्यार्थी शासन मान्य शासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळेत इयत्ता पाचवी किंवा आठवी मध्ये शिकत असावा.
इयत्ता पाचवीच्या २०१७, २०१८, २०१९, २०२० प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.(Click here)

वयोमर्यादा

                     या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय दिनांक 1 जून 2021 रोजी इयत्ता पाचवी करीता अकरा वर्ष व इयत्ता आठवी करिता 14 वर्ष पेक्षा जास्त नसावे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पाचवी करीता15 वर्ष व आठवी करिता 18 वर्षापेक्षा जास्त नसावे.  

परीक्षा शुल्क

                    या वर्षी परीक्षा शुल्कामध्ये परीक्षा परिषदेमार्फत वाढ करण्यात आली आहे. परीक्षा शुल्क खालील पमाणे आहे.

  1.  बिगर मागास विद्यार्थ्यांकरिता 200 रुपये (इयत्ता पाचवी आठवी करिता)
  2. मागास व दिव्यांग विद्यार्थी करिता 125 रुपये (इयत्ता पाचवी आठवी करिता)
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (वी)  परीक्षेचे online फॉर्म www.mscepune.in व https://www.2022.mscepuppss.in/startpage.aspx या site वर भरू शकतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या