Preparatory Exam date may 2021
पूर्वतयारी परीक्षा २०२१
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी परीक्षा घेतली जाते. Preparatory Exam उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुढील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो.
पूर्वतयारी परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. Preparatory Exam परीक्षा 3 मे 2021 रोजी होणार आहे. कोरोनामुळे ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे.
परीक्षेसाठी सूचना
- ऑनलाइन लॉगिन स्लॉट टाईम हे दोन सत्रामध्ये असणार आहे. सकाळ सत्रात सकाळी 8 ते दुपारी 1 व दुपारी सत्रात दुपारी 3 ते रात्री 8 या दोन सत्रात परीक्षा असणार आहे. आपले लॉगिन स्लॉट टाईम तपासून पहा व त्याप्रमाणे त्या सत्रांमध्ये लॉगिन करा.
- लॉगिन स्लॉट टाईम पाच तासांचा असला तरी आपला पेपर मात्र 60 मिनिटाच असेल.
- ऑनलाइन पेपरला सुरुवात केल्यानंतर वीज प्रवाह खंडित झाल्याने किंवा इतर तांत्रिक कारणाने Logout झाल्यास आपल्याला त्याच लॉगिन स्लॉट टाईममध्ये पुन्हा लॉगिन करता येईल व उर्वरित प्रश्न उर्वरित वेळात पूर्ण करता येतील.
- म्हणजेच तुमचे लॉगिन स्लॉट टाईम सकाळी सत्रात आहे. तुम्ही सकाळी नऊ वाजता लॉगीन झालात व प्रश्न सोडवायला सुरुवात केलीत दहा मिनिटानंतर काही तांत्रिक कारणामुळे तुम्ही लॉग आउट झालात व पुन्हा दहा वाजता तुम्ही लॉगीन झालात तर तुम्हाला पहिली दहा मिनिटे वजा करून व सोडवलेले प्रश्न सोडून उर्वरित 50 मिनिटात पुढील प्रश्न सोडवता येतील.
परीक्षा माध्यम
मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू
परीक्षेपूर्वी आपले लॉगिन स्लॉट टाईमची खात्री करा. वेळेत लॉग इन व्हा व आपली परीक्षा द्या.
1 टिप्पण्या
October madhe addmission ghetal ahe ter tyanchi preparatory exam kadhi honar
उत्तर द्याहटवा