NMMS Exam अंतरिम उत्तरसुची
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२१
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतली जाते. सन २०२०-२१ ची परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 06 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आली होती. NMMS परीक्षेची अंतरिम उत्तर सूची परिषदेच्या https://nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अंतरिम उत्तर सूची बाबत महत्वाच्या सुचना
- या उत्तर सूचीतील उत्तराबाबत अथवा प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात करावे लागेल.
- सदर ऑनलाईन निवेदन शाळेमार्फत करता येईल तसेच पालकांनाही स्वतंत्रपणे करता येईल. यासाठी संकेतस्थळावरुण आक्षेप नोंदवावा लागेल.
- त्रुटी अथवा अक्षेपाबाबतचे ऑनलाइन निवेदन भरण्याकरिता दिनांक 16-04-2021 ते 23-04-2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
- दिनांक 23-04-2021 नंतर कोणत्याही प्रकारचे अक्षेप स्विकारले जाणार नाहीत.
- वरील मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना/ आक्षेपांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठवले जाणार नाही.
- विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपाबाबत विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची तयार करण्यात येईल व ती उत्तर सूची परिषदेच्या संकेत स्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.
- आक्षेप फक्त संकेतस्थळावरून online पद्धतीनेच नोंदवावे. इतर पद्धतीने नोंदवलेले आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत.
सदर उत्तरसूचीमध्ये बौद्धिक क्षमता चाचणी (MAT) व शालेय क्षमता चाचणी (SAT) या दोन्ही विषयांच्या उत्तर सूची आहेत. ही उत्तर सूची तात्पुरत्या स्वरुपाची आहे, म्हणजेच यातील काही उत्तरामध्ये बदल होऊ शकतो. हा बदल आक्षेप असणाऱ्या काही प्रश्नामध्येच होईल. नवीन अतिंम उत्तर सूची प्रसिद्ध होताच आपल्यापर्यंत पोहचवली जाईल.
0 टिप्पण्या