Navodaya exam date 2021
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (६ वी)
जवाहर विद्यालय समितीमार्फत संपूर्ण देशामध्ये इयत्ता सहावी व इयत्ता नववीला प्रवेश देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी घेतली जाते. जवाहर नवोदय विद्यालय हे भारत सरकार मार्फत चालवले जाते. या विद्यालयांमध्ये इयत्ता सहावी आणि नवी करीता प्रवेश दिला जातो. सहावीला प्रवेश घेण्यासाठी इयत्ता पाचवीमध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेस बसलेले विद्यार्थ्यामधून ज्या विद्यार्थ्यांना पात्र गुण मिळतील अशा विद्यार्थ्यांची निवड लिस्ट विद्यालय मार्फत प्रसिद्ध केली जाते. परीक्षेमध्ये पात्र ठरतात अशा विद्यार्थ्यांना त्याने निवडलेल्या जवाहर नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश दिला जातो.
दरवर्षी Navodaya exam परीक्षा जानेवारी फेब्रुवारी मध्ये होत असते. मात्र यावर्षी उद्भवलेल्या कोरूनाच्या पार्श्वभूमीमुळे Navodaya exam आजपर्यंत झालेल्या नाहीत. ही परीक्षा मिझोरम, नागालंड व मेघालय सोडून सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशामाध्ये 16 मे 2021 रोजी होणार होती मात्र विद्यालयामार्फत एक नवीन सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे या सूचनेनुसार ही परीक्षा 16 मे 2021 रोजी होणार नाही. आताच्या सूचनेनुसार ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे परीक्षेची तारीख ही परीक्षेपूर्वी कमीत कमी 15 दिवस अगोदर कळवण्यात येईल अशा प्रकारची माहिती या सूचनेमध्ये देण्यात आले आहे ही सूचना आपण खालील लिंकवरून डाऊनलोड करू शकता.
0 टिप्पण्या