Mithacha shodh swadhay iyatta chouthi

 मिठाचा शोध

इयत्ता - चौथी.



प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे?
पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे.

२) आदिमानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीची खूप निरीक्षण केले?

हरीण ठराविक जागी एका झाडाच्या बुंध्यापाशी असलेल्या दगडांना चाटतात या गोष्टीचे आदिमानवाने खूप निरीक्षण केले.

३) खनिज मिठाला आपण काय म्हणतो?

खनिज मिठाला आपण सैंधव मीठ म्हणतो.

४) माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले?

माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून जरा लांब एका खड्ड्यात साठवले.

प्र २) गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.

१) बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं त्याला खूप आश्चर्य वाटलं 

२) कंदमूळ खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला.

३) त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती.

४) ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं.

प्र ३) का ते सांगा.

१) आदिमानवाने दगड चाटून पाहिला. 

काही दिवस निरीक्षण केल्यानंतर हरीण ठराविक जागी एका झाडाच्या बुंध्यापाशी असलेला दगड चाटताना आदिमानवाने पाहिले, म्हणून कुतुहलाने त्याने दगड चाटून पाहिला.

२) समुद्राचे पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले.

आदिमानवाच्या हाता पायांना खर्चटून जखमा झाल्या होत्या, म्हणून समुद्राचे क्षारयुक्त पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले.

३) समुद्रकिनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला.

समुद्रकिनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला कारण आदिमानवाला समुद्राचे पाणी खड्ड्यात साठवायचे होते.

प्र ४) समानार्थी शब्द लिहा.

१) जंगल - अरण्य, वन

२) झाड - वृक्ष

३) लांब - दूर 

४) दिवस - दिन

५) समुद्र - सागर

६) पाणी - जल

प्र ५) खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.

१) निरीक्षण करणे.

मनालीने काढलेल्या चित्राचे मुलांनी निरीक्षण केले.

२) कुतूहल वाटणे.

बाजारातून आणलेल्या पिशवीकडे पाहून कविताला कुतूहल वाटले.

३) अंगाला झोंबणे.

पहाटेचा गार वारा अंगाला झोंबतो.

प्र ६) मीठ या शब्दासोबत दाखवलेला एक - एक शब्द घेऊन वाक्यप्रचार तयार करा. त्याचा अर्थ समजावून घेऊन वाक्यात उपयोग करा.

मीठ  - जागणे, खडा, जखम, महाग

१) मिठाला जागणे - कृतज्ञ असणे.

आमचा कुत्रा घराची राखण करून खाल्ल्या मिठाला जागतो.

२) मिठाचा खडा पडणे - एखादे काम बिघडणे.

मिराच्या वाढदिवसाच्या पार्टीला लाईट गेली नि सर्वांच्या आनंदात मिठाचा खडा पडला.

३) मिठाला महाग होणे - अत्यंत दारिद्र्य येणे.

पुरामुळे गाव उध्वस्त झाले आणि जो तो मिठाला महाग झाला.

४) जखमेवर मीठ चोळणे - आधीच्या दुःखात अधिक      दुःख देणे.

पैसे हरवलेल्या राजूला वाईट बोलून सोहमने त्याच्या  जखमेवर मीठ चोळले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या